आता क्षणभर विश्रांति,
मन थकल थकल,
तुझ्या वेड्या पिलाच घरट कुणी
मोडल मोडल,
स्वप्न मोडुनिया गेली,
उरे एकटीच सांजवात,
एक ओंजळ प्राजक्त,
फुले रातराणीच्या गर्भात,
पहाटेस निशिदिनी,
तुझे होईल स्मरण,
किलबिल चिउताई,
करुनीया झेप घेई अंबरात,
अकाशास वेड तुझे,
मेघ हंबरुनी गाई प्रेमगाणे,
मोकळ्या श्वासास आता तुझे नवीन
बहाणे,
सांगायची होती तुला एक कवितेची
ओळ,
फुलापरी जपलेली माझ्या आसवांची
माळ,
राहुनिया गेले गुंफायचे जपलेले
क्षण सारे,
तुझ्याविना जमेना हा आयुष्याचा
मेळ,
फुलाला फुलाचा सुगंध कसा यावा,
मैत्रीला विश्वासाचा विसर न
व्हावा,
रंग-गंध व्हावे एकरूप इंद्रधंनुसाठी,
मायेस वात्सल्याचा अभिमान न
व्हावा.
तुझ्या माझ्या अंतरीची एक व्यथा,
आता रोजचीच रोजनिशी,
त्यात तुझी छटा,
शाई अन पानावरी,
रूप साकारत आहे,
पहा पहा तेच मन,
नव हृद्य बहरत आहे... बहरत आहे...
No comments:
Post a Comment