Friday, December 9, 2011

सार्थक ......

सार्थक

आयुष्यात काहीच केल नाही,
हे सगळ जमत नाही,
आयुष्याचा कंटाळा आलाय,

मग ,
स्वताला समुद्राच्या लाटांवर झोकून द्या,
अजूनही जिवंत आहात,
तो समुद्रही तुम्हाला स्वीकारत नाही,
मग,
स्वताच स्वताचा श्वास संपवत जा,
प्रत्येक श्वासाच महत्व कळेपर्यंत.

अन मग,
फुलाच्या सुगंधापरीस एकदा तरी स्वताला चौफेर उधळून बघा,
रोज रोज दुसर्यांसाठी मरण्याआधी स्वतासाठी जागून बघा.

अहो,
खिडकीच्या गजाआडून काय पाहता , दरवाजा उघडून बाहेर या,
कधीतरी या दुनियेत उघड्यावर स्वताला हरवून या.

जमलंच तर,
समोर जमलेल्या बघ्यांच्या बाजारगर्दीत मन फिरवून या,
भावनांची कवडीमोल विक्री पाहणारी मन, एकदा जागून घ्या.

पण,
पायाखाली काटेरी वाट आली तरी माणुसकीची कास सोडू नका,
विजय नाही मिळाला तरी चालेल, पाऊलवाट वाकडी करू नका,
सार्थक होईलच जीवन सांर , पण म्हणून अरसिक जगू नका.

नाही जमल , असही तर पुन्हा एकदा जन्म नक्कीच घेऊन बघा......

No comments:

Post a Comment