Tuesday, August 7, 2012

तू जणू आरसा




मी मन माझे, अन तू जणू आरसा,
मी राहे साचुनी तैसाच,
तू नेई मजसी पुढे जणू,
मी प्रवाही जसा,
शुद्ध तू, निर्मल तू,
अन एक नितांत सुरेल निर्झर तू,
स्तब्ध तू, स्निग्ध तू,
स्मित तू, ह्रीद्गंध तू,
मनामनांचे बंध अन फुलणारा निशिगंध तू,
मोहुनिया जाई वसंत,
फुले शिशिरही,
सर्ग तू जोडणारा,
अन विपर्णी मूळ होवुनी,
रोवणारा बंध तू,
शब्द मी अन अर्थ तू,
प्रेम मी अन प्रीत तू,
स्वर मी अन ताल तू,
सर मी अन ओघळणारा थेंब तू,
फुलांमधील मधु मी अन भ्रमर तू,
तू आहे तुही अन थोडा मी ही तू.

No comments:

Post a Comment