निशब्द चांदव्याशी खेळता,
घनांच्या पलीकडून तुझी साद येते,
अस्वस्थ चांदण्याशी बोलता,
संध्येच्या अंतरातून मन उदास वेडे होते
"अश्रू आग ओकून दु:ख भिजवून जातात,
तू गेल्यापासून शब्दही मुके गीत गातात."
भिंतींशी गुज मनीचे साधता,
सखे उंबरा ओलांडूनी तुझे पाऊल आत येते,
हळूच क्षितिजापलिकडे,
तार्यांच्या विजनवासात अमूर्त ही तुझेच रूप घेते.
"डोळे गहिवरल्य स्पंदनानी भिजून जातात,
रोज पहाटे सप्त स्वराणी पक्षिही तुझेच कुजन करतात."
No comments:
Post a Comment