हे मुख्य पान म्हणजे प्रस्तावना नव्हे, पण कवितेच्या अंतरंगात जाताना मला
जे काही भावलं त्या प्रवासाचं वर्णन करण्याचा प्रयत्न. माझी पहिली कविता मी
सातवीला असताना केली आणि तीही तात्या टोपे यांच्यावर. माझ्या तिला हवी
होती म्हणून, अर्थात कविता तितकीशी यमक अंगांन नेटकी नव्हती पण गणित जमल
माझ आणि कवितेच. पण कवितेला बहर आला तो कॉलेजलाईफ मध्ये. अकरावी मध्य
असताना अनेक स्पर्धा संतही म्हणून स्वताच अस लिखाण करत गेलो आणि मग
कवितांचा प्रवास सुरु झाला. ह्या प्रवासात मी माझ्या दोन कविता गमावल्या
ह्याच दुख आहे पण अर्थात त्या माझ्या आवडत्या कविता होत्या आणि त्या मी
जपून ठेवू नाही शकलो हे ही तितकाच खर आहे. "माझा सखा" आणि "उल्का" अशा त्या
दोन कविता. पण या प्रवासात मी प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या कविता लिहिल्या
आणि तशाच प्रेम हातून निसटून गेल्यावर "प्रेमाची बंदिश" पण लिहिली.
स्वाभाविकपणे काही ठिकाणी माझा आयुष्याकडे बघण्याचा निराशावादी दृष्टीकोन
जाणवतो कवितेमधून पण पुन्हा एकदा त्याच जुन्या मदमस्त हत्तीच्या धुंद
चालीच्या कविता प्रसवू लागल्या आहेत याच जरा समाधान वाटतंय. अर्थात पेशान
किंवा शिक्षणाने मी जरी मशीन वाला माणूस असलो तरी सुदैवाने अजूनही माणूसच
आहे.
मला नवीन माणसाना भेटण्याचा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा
छंद आहे. अर्थात यात मी चेन्नैला शिकतो या गोष्टीचा फायदाच झाला कारण रोज
रोज नवीन माणस भेटतात. पुणे-नाशिक-चेन्नई असा झालेला हा प्रवास अजून कुठे
जाणार आहे हे तर येणारा काळच ठरवेल पण या प्रवासात माझ्या शब्दांनी आणि
माझ्या जन्मदात्यांनी मला जी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. कारण
आई बाबांच्या आशीर्वादाशिवाय हे शब्दवैभव कदाचित बहारालाही नसत. अर्थात
माझी अनेक मित्र मैत्रिणींचा मला मिळालेला, हुरूप वाढवणारा, तो नेहमीच चं
शब्दांनी होता असे नाही, पण तरीही प्रोत्साहनपर पाठींबा खूप महत्वाचा आहे.
मी त्यांचाही ऋणी आहे. पण त्याचबरोबर मी माझ्या मराठीच्या पाटकर बाईंचा पण
ऋणी आहे ज्यांनी मला माझे "जीवनातील मित्राचे स्थान" आणि "कविवर्य केशवसुत"
हे दोन शिष्यवृत्ती परीक्षे करिता लिहिलेले निबंध वाचून सांगितलं कि तू एक
लेखक हो. अर्थात मी पूर्ण वेळ नाही झालो तरी मानाने मात्र मी एक कवी आहे.
एक क्षण आला होता जेव्हा मी मझ्या कविता समुद्राला अर्पण करू निघालो होतो,
त्यावेळी थांबवल्याबद्दल माझ्या एका जवळच्या मैत्रिणीचा मी ऋणी आहे. तिने
मला पुन्हा एकदा उभारी दिली.
अजूनही बराच मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. आयुष्याची सुरुवात
होते आहे. उच्च शिक्षण घेवून मग नोकरी किंवा व्यवसाय किंवा
उदरनिर्वाहाकरिता कोणताही एक पेश स्वीकारला तरी माझ्या मनातल कवितेच प्रेम
कधीच कमी होणार नाही हे मात्र नक्की. तरीही मला माझ्या आई - बाबांच्या
अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. जस म्हटलं तस ही फक्त सुरुवात आहे, अजूनही
खूप काही शिकायचं हे, पुस्तकातूनही आणि प्रवासातूनही. तुम्हा सर्वांच प्रेम
आणि शुभेच्छा अशाच पाठीशी राहोत हीच नम्र विनंती.