तुझ्यामुळेच नाही झालो मी दुनियेचा गुलाम.
केल असतं त्यांनी मला राजा, भातुकलीच्या खेळात
अन मांडला असता माझा बाजार एका बंद कपाटात
तू जवळ होतास म्हणून जे आहे ते स्वीकारत गेलो,
तू साथ दिलीस म्हणून तप्त उनही सावली समजत गेलो.
कुणीच नाही भेटायचं, जवळच आपलस ओळखीच,
ज्याचे त्याचे चेहरे, जणू मी त्यांच्यासाठी एक सांज.
तू मात्र रोज भेटलास, माझ्यासाठी वेळ ठरलेली तुझी,
जाताना प्रतिबिंबाची स्वप्न करून जायचास माझी.
जलसफर तूच घड्विलीस मला होडीतून पहिली,
तुझ्या विरहाची पहिली सोबत तिथेच ना घडली.
मग हरवलास तुही, माझ्यासारखाच भर रस्त्यात,
अगदी आजपर्यंत, भटकत होतास अधांतरी.
अरे दोस्त किती शोधलं तुला, तुझ्या सावलीत मी
होता फक्त तुझ्यावर विश्वास, बाकी दुनिया हरामी,
सगळ काही विसरून जावू, पुन्हा जलसफर करू,
तुझ माझ नातच अमानवी, दुनियेचे नियमही झुगारु.
खरच मावळत्या सूर्या तुला माझा सलाम,
कारण तूच आहेस माझा सखा...
मी मात्र तुझ्या दोस्तीचा गुलाम.
मी मात्र तुझ्या दोस्तीचा गुलाम.
-शिवरंजन कोळवणकर

No comments:
Post a Comment