तू आहेस हसवायला, म्हणून रडायला आवडत,
तू आहेस मनवायला, म्हणून रुसायला आवडत,
तू सोबत आहेस, म्हणून तर जगायला आवडत...
तुझ्या भेटीसाठी मन, स्वप्न पाखरू होत,
तू असतेस सोबतीला माझ्या,
तेव्हा दूर जायला वेदनेलाहि आवडत...
शब्द आहेत तुझे म्हणून अर्थ व्हायला आवडत,
आहेत तुझी स्वप्न, थोडी दूरची,
पण म्हणून तुझी सावली व्हायला आवडत...
आता उरलेत फक्त काही क्षण तुझ्या माझ्या मिलनाचे,
दिवस रुपेरी अन रात्र शारद होवू लागलेय,
तुझे स्पर्श आहेत म्हणून तर मंद झुळूक व्हायला आवडत...
अग...
बहरेल रातराणी आपल्या दारीही...
रातराणीसवे...
माझा हात तुझ्या हाती देऊन...
माझा हात तुझ्या हाती देऊन...
मला तुझ व्हायला आवडत...

No comments:
Post a Comment