एक ओढ अंतरात, आहे चांदव्याची आस,
गूढ सावलीस माझ्या, तुझ्या चांदण्यांचे भास.
तुझ्या माझ्यातून घडे, नवं बीज अंकुरात,
तूच माझा स्वर, तुझ्या एकटीची साथ.
दिस जाई अनाहूत, राही संध्येचीच छाया,
घास अडतो हा ओठी, तुझी आईपरी माया.
सखे विनवितो तुज, तूच अंतरीचा भाव,
येशील ना पुन्हा, घेई उंबऱ्याशी धाव.
अखेरचे शब्द माझे, देतो अखेरची साद,
रण-रणत्या वाळवंटी, चाले मृगजळी वाद.
आता शब्द गेले सांडूनिया, नुरे प्रतिभेची जोड,
उधळतो प्रीत माझी, कर शेवट हा गोड.
--- शिवरंजन कोळवणकर.
No comments:
Post a Comment