माझ जीवन भरल्या वनराईसारख ,
आजी-आजोबांनी लावलेल्या रोपापासून,
तयार होत होत.....
कित्येक वादळाना तोंड देत देत ,
अन कधी वादळासमोर झुकत ,
पुन्हा उभे राहत ,
कधी शिशिरात निष्पर्ण होत ,
पुन्हा वसंतात नवी पालवी लेवून ,
भरल्या मोहोरान पांथस्थाला फळ देत ,
अन कधी त्यांचेच दगड फांद्यावर घेत ,
माझ्या फळांपासून वनराईत एकाची भर घालत ,
अगदी रोपापासून झाड ,
अशी वनराई दाट करत,
अखेरीस मुळांवर घाव खात ,
वनराईपासून कायमच अलग होत ,
अश्रुना स्वर्गातून जलधारा करून पाठवणार ,
माझ जीवन अगदी भरल्या वनराईसारख ,
मोहोरलेल , फळलेल , ....... हिरवंगार अन शांत .
---- शिवरंजन कोळवणकर
No comments:
Post a Comment