प्रेमवेडी गोष्ट संपता संपत नाही,
तुला पाहिल्याशिवाय आता राहवत नाही,
राहून गेल्या पुसटश्या त्या आठवणी,
आठवूनी त्या का ग आज डोळ्यात या पाणी,
मनमंदिरात माझ्या जेवा तू येतेस,
नकळत साद का अन अशी मला तू देतेस,
उधाणलेल्या दर्यावर स्वार जशी लाट येते,
तुझ्या स्वप्न देशी माझी पहाट होते,
क्षणभर पसरलेल्या तुझ्या मायेच्या पदराखाली,
नजरेआड होते तुझ्याच गालावरची लाली.
सांग ना सखे.........
सांग ना सखे.........
कुठून आणायची रोज रोज ही गुलाबाची कळी,
दारी असताना तुझ्यापरी जाई-जुई अन बकुळी.
---- शिवरंजन कोळवणकर
No comments:
Post a Comment