लवलवत्या तारुण्याची सफर ज्याने केली,
ते नवतारुण्य सिकंदर मी,
तळपत्या सूर्यावर स्वारी ज्याने केली,
तो चंद्र शीतल हि मीच.
असा,
अनादी मी , अनंत मी , अवध्य मी.
अन मर्त्य मानव हि मीच.
जेव्हा गौरवाने स्वाभिमान सांगावा,
तेव्हा अभिमानाचे शल्य उरी बाळगणारा,
अस्वस्थ महाराष्ट्र मी.
ज्यांच्या शौर्याचे पोवाडे गावेत,त्यांचेच पाय होऊन ,
दारा आड लटपटणारा ,कोणी एक भित्रा मी.
असा,
अनादी मी , अनंत मी , अवध्य मी.
अन मर्त्य मानव हि मीच.
मायेताला ' मा ' अन आईतला ' ई ' ,
घेऊन घडणारा मी,
तुझ्या माझ्यातला मी ,
माझ्या तुझ्यातला मी ,
शब्दही मी अन शब्दा मधले उसने बळही मीच ,
पावसान ओलेचिंब होऊन रक्तान न्हाण मी,
धर्मांच्या भेदातील उसन्या बळावर उभा पाखंडी मी,
असा,
अनादी मी , अनंत मी , अवध्य मी.
अन मर्त्य मानव हि मीच.
मृत्यू येई सामोरा , मरणास होई घाबरा मी ,
पण पतिव्रतेच्या सतीपणावर हसणारा मी,
अखेरीस माझ्याच नग्नतेचे बंड करणारा मी ,
असा,
अनादी मी , अनंत मी , अवध्य मी.
अन मर्त्य मानव हि मीच.
---- शिवरंजन कोळवणकर
जेव्हा गौरवाने स्वाभिमान सांगावा,
तेव्हा अभिमानाचे शल्य उरी बाळगणारा,
अस्वस्थ महाराष्ट्र मी.
ज्यांच्या शौर्याचे पोवाडे गावेत,त्यांचेच पाय होऊन ,
दारा आड लटपटणारा ,कोणी एक भित्रा मी.
असा,
अनादी मी , अनंत मी , अवध्य मी.
अन मर्त्य मानव हि मीच.
मायेताला ' मा ' अन आईतला ' ई ' ,
घेऊन घडणारा मी,
तुझ्या माझ्यातला मी ,
माझ्या तुझ्यातला मी ,
शब्दही मी अन शब्दा मधले उसने बळही मीच ,
पावसान ओलेचिंब होऊन रक्तान न्हाण मी,
धर्मांच्या भेदातील उसन्या बळावर उभा पाखंडी मी,
असा,
अनादी मी , अनंत मी , अवध्य मी.
अन मर्त्य मानव हि मीच.
मृत्यू येई सामोरा , मरणास होई घाबरा मी ,
पण पतिव्रतेच्या सतीपणावर हसणारा मी,
अखेरीस माझ्याच नग्नतेचे बंड करणारा मी ,
असा,
अनादी मी , अनंत मी , अवध्य मी.
अन मर्त्य मानव हि मीच.
---- शिवरंजन कोळवणकर
This comment has been removed by the author.
ReplyDelete