एकतरी मैत्रीण असायलाच हवी
मनातील सारी गुपित सांगून,
मन मोकळ करायला.
एकतरी मैत्रीण असायलाच हवी
मनातल्या भावना व्यक्त करून,
नव्याने हे जीवन जगायला.
एकतरी मैत्रीण असायलाच हवी
मनातील सारी दुख सांगून,
नव्याने हे जग अनुभवायला.
एकतरी मैत्रीण असायलाच हवी
आपल्याकडच सुख वाटून,
तीच दुख समजून घ्यायला.
एकतरी मैत्रीण असायलाच हवी
कोल्माद्ताना आधार घायला,
अन सदैव खाम्बिर्तेन वाटचाल करायला
एकतरी मैत्रीण असायलाच हवी
मन एकट झाल्यावर,
तिच्या आठवणीत क्षण अनुभवायला.
एकतरी मैत्रीण असायलाच हवी
मैत्री साठी, तिच्या साठी,
आठवणींसाठी आणि माझ्यासाठीही...
|
Wednesday, April 18, 2012
एकतरी मैत्रीण असायलाच हवी...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment