वाऱ्यावरची नौका.......
जगणे माझे वाऱ्यावरची नौका,
कधी किनारी, कधी तुफानी,
कधी लागतो धक्का....
अन सहजची जाता,
लहरींसह सागरासही देतो झोका.
"तुम्ही मंत्र म्हणून संस्कृतीचे पाठ पढवता. पण रोज पिवून तर्र होवून मी जगण्याचे जाते दळतो."
पिवूनिया एकच प्याला,
होतो स्वच्छंद मी धुंद शराबी,
कधी मदहोशीचा गातो हुक्का,
अन दुनियेच्या ढोंगावर,
हसण्याचा मी घेतो मौका.
"नास्तिकही ना मी अन आस्तीकाही नाही, ना ही मी दाता अन ज्ञाता. रोजचीच आरती तुमची पण देवाला घाबरता"
आरतीनंतर तुमचा मागण्याचा पुडा
माझी आहे देवपनावर श्रद्धा,
जा कधीतरी हसत त्या दरबारी,
तो ही घेईल एक चुटका.
जगणे माझे वाऱ्यावरची नौका.......
No comments:
Post a Comment