लोकशाही ---------------- संपत चालली
लोकशाही ---------------- संपत चालली
लोकशाही - लोकशाही - लोकशाही ,
लोकशाही कधी लोकांची शाही
कधी झालीच नाही,
कधी राज्यकर्त्यांनी गोंधळ घातला,
कधी विरोधकांनी बाकं वाजवली,
यात अवघी पाच वर्ष गेली,
पुन्हा पुढची निवडणुकही आली,
सत्तेची धुंदी चढली होती,
त्यात खुर्चीची हावही लागली,
आणि सत्तेच्या साठमारीत लोकशाही
उभी राहण्याआधीच संपून गेली,
कधी राज्यकर्ते झोपले,
कधी मतदारराजा हतबल झाला,
शहाणा मध्यमवर्ग पगारचक्रात अडकला,
अन गरीब बिचारा गरिबीन चुच्कारला,
श्रीमंतानी तिकडे माया गोळा केली,
शेतकऱ्यान मात्र इकडे हाय खाल्ली,
आर्थिक-सामाजिक समानता वरवरच दिसली
राजकीय समानतेची तर पाळ्मुलच खणली गेली
आणि,
सत्तेच्या साठमारीत लोकशाही
उभी राहण्याआधीच संपून गेली,
No comments:
Post a Comment