Tuesday, April 5, 2011

गुढी विजयाची माझ्या दारी

घर असे खूप-खूप दूर तरी आठवांचे पूर,
एक-एकट्याची वाट का उगाच हूर-हूर

थोडी आईच्या मायेची असे उबदार उशी,
आता नाही इथे बाबा तुमच्या रागाचीही कुशी,

आता उराशी बाळगतो संस्कारांची शिदोरी,
उभारीन मी आता गुढी विजयाची माझ्या दारी 

No comments:

Post a Comment