तुझ्या डोळ्यात पाहिल्या वेदनेची ,
पूर्वी पानांची सळसळ झाली,
कि हात तुझा समोर यायचा,
आता आठवण तुझी आली,
तरी पानांची सळसळ होत नाही.
मी ओंजळ करून झुकायचो,
अन तू फुलं तोडून जायचीस,
आज तू रातराणी होवून बरसतेस,
पण माझी ओजल मात्र झुकत नाही,
आयुष्य म्हटलं कि असंच असतं,
कधी बेरजेचं अन कधी वजाबाकीच,
असतात कधी गुणाकार भागाकारही,
पण आमचा अपूर्णांक कधी उरत नाही,
पण काळ संध्याकाळी,तुझ पत्र मिळाल,
लिहील होतास, राजा मला माफ कर,
अन आज पाहते उन्मुक्त बिलगलीस,
तेव्हा कळलं,
तुझ्या प्रेमाची खोली कधी कळलीच नाही.
असतात कधी गुणाकार भागाकारही,
पण आमचा अपूर्णांक कधी उरत नाही,
पण काळ संध्याकाळी,तुझ पत्र मिळाल,
लिहील होतास, राजा मला माफ कर,
---- शिवरंजन कोळवणकर
khupach mast
ReplyDeletethnx madhura
ReplyDelete