त्या निळाशार समुद्रात ,
एक होडी फिरत होती ,
ऐलतीराहून पैलतीराकडे जाणारी ,
अन होडीतील ते सहप्रवासी ,
साक्षीदार एका निरंतर प्रवासाचे ,
एक वेगळीच सफर करत होतो .
तेव्हाच ,
आपला आसरा शोधत ,
पक्ष्यांचा एक ठाव आसमंतात विहरत होता ,
त्यांची सावली लाटांवर पसरली होती ,
त्याकडे पाहून मन दुभंगले होते ,
कारण , अशीच अवस्था आपलीही येणार ,
जीवनप्रवासाचा किनारा लागणार ,
आपलाही आसरा शोधावा लागणार ,
तो क्षण जेव्हा येईल ,
तेव्हा ही जलसफर स्मरेल ,
मग , मनाला आधार मिळेल ,
पैलतीराहून ऐलतीराकडे येण्याच ,
उसन बळही ,
मग एक गरुड भरारी ,
हेच त्या जलसफरीचे सामर्थ्य असेल .
---- शिवरंजन कोळवणकर
एक होडी फिरत होती ,
ऐलतीराहून पैलतीराकडे जाणारी ,
अन होडीतील ते सहप्रवासी ,
साक्षीदार एका निरंतर प्रवासाचे ,
एक वेगळीच सफर करत होतो .
तेव्हाच ,
आपला आसरा शोधत ,
पक्ष्यांचा एक ठाव आसमंतात विहरत होता ,
त्यांची सावली लाटांवर पसरली होती ,
त्याकडे पाहून मन दुभंगले होते ,
कारण , अशीच अवस्था आपलीही येणार ,
जीवनप्रवासाचा किनारा लागणार ,
आपलाही आसरा शोधावा लागणार ,
तो क्षण जेव्हा येईल ,
तेव्हा ही जलसफर स्मरेल ,
मग , मनाला आधार मिळेल ,
पैलतीराहून ऐलतीराकडे येण्याच ,
उसन बळही ,
मग एक गरुड भरारी ,
हेच त्या जलसफरीचे सामर्थ्य असेल .
---- शिवरंजन कोळवणकर
No comments:
Post a Comment