Sunday, December 4, 2011

एक मधुर कहाणी : माझा नवा जन्म

एक मधुर कहाणी हळूच साकार होईल,
जन्म-जन्मांतरीची पोकळी भरून निघेल.
भीती नेहमीच वाटते पण आता तीही नसेल,
इतक्या वेळा प्रत्येक वळण एकट्याने घेवून,
आता जणू वळण एकट्याने चुकवण्याची सवय झालेय,
पण आता हे स्वप्न साथीला असेल.
खूप छोटी छोटी स्वप्न पूर्ण करतच हा,
मोठा प्रवास करायचा असतो,
म्हणून आज या प्रवासाला सुरुवात होईल.
हळू हळू हा प्रवास चालूच राहील.
मार्गात पथदर्शी असतील तसे काटेही असतील,
फुलही असतील, पण प्रत्येक अनुभव वेचत हा प्रवास सुरु राहील.
साथ आहे शब्दांची या,अन तिचीही सोबत असेल,
साज जणू सांगत राहील , जा पुढे असंच,
अरे मागे जाणं हा काही नियम नव्हे,

नदीतीरी बसलेला मी, खूप खूप युगे,
प्रवाह परतण्याची वाट बघत,
दाटीवाटीने झाड कुज्बुज्तील, कुणीतरी वेडा आहे,
प्रवाहाच्या उलट फिरण्याची वाट पाहत जन्म संपला याचा तरी,
हा इथेच आहे नदीकाठी,
प्रवाह परतेल किंवा अखंड धारा सुरूच राहील,
पण एक वेडा प्रयत्न केल्याच समाधान मिळेल,
अखेरीस हीच ती शिकवण, मन टिपून घेईल,
अखंड प्रवाहित राहा, नवे मार्ग येत राहतात,
नवी वळणही, आपण फक्त वाहून नेणे स्वताला,
दिशा निर्माता दाखवत राहील,

आता पुन्हा एक मधुर कहाणी जन्म घेईल,
अन हा प्रवास असाच सुगंधित होईल,
आयुष्याच्या या पर्वाचे हे स्मित मला मात्र,
पुन्हा नव्याने जाता जाता,
माझ्यावर उधळता येईल.

No comments:

Post a Comment